मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशातील विविध राज्यांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे. या अंतर्गत, प्रत्येक राज्याला वेगळ्या संख्येने अतिरिक्त जागांचे वाटप केले जाईल. मात्र, या जागा जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांनाच देण्यात येणार आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालयांबाबत कोणते नियम लागू होतील, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणात, महाराष्ट्राच्या वाट्याला एमबीबीएसच्या एकूण 150 अतिरिक्त जागा येतील. लोकसभेतील खासदार डॉ. हीना गावित आणि डॉ. श्रीकांत एकनाथ सिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
Maharashtra MBBS Seats : देशभरात एमबीबीएसच्या 3495 जागा वाढणार, जाणून घ्या महाराष्ट्राच्या वाट्याला किती आल्या?
या राज्याला दिल्या गेल्या सर्वाधिक जागा –
देशभरात वाटप करण्यात आलेल्या अतिरिक्त एमबीबीएस जागांपैकी सर्वाधिक जागा राजस्थानच्या वाट्याला आल्या. एकूण 3495 जागा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विचाराधीन आहेत. त्यापैकी राजस्थानला एकूण 700 जागा देण्याची योजना आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून, त्याला 600 जागा देण्यात येणार आहेत.
गेल्या पाच वर्षांत वाढल्या आहेत इतक्या जागा –
मंत्रालयाने आपल्या उत्तरात पुढे म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयातील 24404 जागा वाढवण्यात आल्या आहेत. यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयांची संख्याही वाढली असून एकूण 132 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली आहेत.
UG च्या या सत्रापासून लागू होईल NEET –
या संदर्भात मंत्रालयाचे म्हणणे आहे की, एमबीबीएसच्या या वाढलेल्या जागा NEET UG च्या या सत्रापासून लागू होतील. याचा फायदा वैद्यकीय विद्यार्थ्यांना होणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्र निवडण्याची संधी मिळेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.