lottery : कर्ज फेडण्यासाठी विकायला निघाला होता घर, दोन तासांपूर्वी लागली एक कोटींची लॉटरी


कर्जबाजारी 50 वर्षीय मोहम्मद बावा यांची इच्छा अखेर पूर्ण झाली. कर्जामुळे, बावा आपले नवीन बांधलेले घर आहे त्या किमतीत विकण्यास तयार होते, परंतु कराराच्या अवघ्या दोन तास अगोदर 1 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याने त्यांचे आयुष्य बदलले.

केरळच्या उत्तरेकडील जिल्ह्यातील मंजेश्वर येथील रहिवासी असलेल्या बावा यांच्यावर नातेवाईक आणि बँकेचे 50 लाखांचे कर्ज होते. आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी आणि व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी हे कर्ज घेतले होते. लॉटरीचा निकाल लागल्यानंतर बावांनी आता आपले घर न विकण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जमुक्तीच्या आशेने बावा यांनी रविवारी केरळ सरकारची लॉटरीची तिकिटे काढली होती. रविवारी दुपारी साडेतीन वाजता लॉटरीचा निकाल जाहीर झाला. आता बावांचे कुटुंब आनंदोत्सव साजरा करत आहे.