Coronavirus Cases : कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ, काल दिवसभरात 20557 नवीन रुग्णांची नोंद


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दररोज हा आकडा 15-16 हजारांच्या पुढे नोंदवला जात आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20 हजार 557 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, या कालावधीत 44 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 323 झाली आहे.

त्याचबरोबर देशातील कोरोनाच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली तर आता ही संख्या 4 कोटी 39 लाख 59 हजार 321 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 26 हजार 211 वर गेली आहे.