हे घडले असते तर ३० वर्षापूर्वीच देशाला मिळाले असते आदिवासी राष्ट्रपती
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्टपती बनण्याचा विक्रम केला आहे. मात्र आदिवासी समाजातील व्यक्तीने राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्याचा हा पहिला प्रसंग नाही. यापूर्वी सुद्धा भाजपने दोन आदिवासी नेत्यांना राष्टपती पदाच्या उमेदवारी साठी समर्थन दिले होते. पण निवडणुकीत त्यांना विजय मिळाला नाही.
१९९२ मध्ये राष्ट्रपती निवडणूकीत भाजपने सहयोगी पक्षांचे उमेदवार जॉर्ज गिल्बर्ट स्वेल यांना समर्थन दिले होते. त्यावेळी कॉंग्रेस युपीए सरकार सत्तेत होते आणि त्यांनी शंकर दयाळ शर्मा यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सोपविली होती. स्वेल हे मेघालय मधील आदिवासी नेते होते. पण या निवडणुकीत शर्मा विजयी झाले आणि देशाला पहिला आदिवासी राष्टपती मिळण्याची संधी हुकली. अन्यथा ३० वर्षापूर्वीच आदिवासी जमातीतील व्यक्ती राष्ट्रपती बनली असती.
२०१२ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी कॉंग्रेसने प्रणव मुखर्जी यांना उमेदवारी दिली. तेव्हा बीजेडी आणि एआयएडीएमके या पक्षांनी मेघालयचे आदिवासी नेते पीए संगमा यांना उमेदवारी दिली होती आणि त्याला भाजपने सर्मथन दिले होते. या निवडणुकीत संगमा पराभूत झाले होते. आज प्रणवदा आणि संगमा दोघेही हयात नाहीत. मात्र संगमा यांनी त्यावेळी देशाला लवकरच आदिवासी राष्ट्रपती मिळेल असे भविष्य केले होते आणि आज त्यांचे भविष्य सत्यात उतरले आहे.