जगातील सर्वाधिक गुंतागुंतीचा रस्ता, जणू भूलभुलैयाच

फार पूर्वी किल्ले, गडावर शत्रूला चकवा देण्यासाठी भुयारे, गुंगारा देणारे मार्ग बांधले जात असत. आधुनिक काळात सुद्धा ही प्रथा सुरु राहिली आहे असे दिसते. अर्थात येथे शत्रूला गुंगारा देण्याचा प्रश्न नाही. चीन मध्ये असाच एक ओव्हर पास बांधला गेला आहे . याला जगातील सर्वात गुंतागुंतीचा ओवर पास म्हणून ओळखले जाते. येथे रस्त्यांचे असे जंजाळ आहे कि नवखा चालक एका टोकापसून दुसरीकडे न चुकता जाऊ शकणार नाही. स्थानिक चालकाशिवाय येथे गाडी चालविणे फार अवघड आहे.

चीनच्या चाँगक्विंग मधील ‘ Huangjuewan overpass ‘ हा तो रस्ता. याचे नाव उच्चारणे जेवढे अवघड तेवढाच हा पास सुद्धा अवघड. इंटरनेटवर या पासचे अनेक फोटो वेळोवेळी व्हायरल होत असतात. वाहनचालक हा पास नुसता पाहुणचा हैराण होतात. पाच लेव्हल, २० रँपसह येथे इंटरवाईंड आहेत आणि त्या ३ एक्स्प्रेस वेला जोडल्या गेल्या आहेत.

या रस्त्याचे डिझाईन करणारे सांगतात, दिसतो तेवढा हा पास दुष्कर नाही. २०१७ मध्ये त्याचे काम पूर्ण झाले असून या रस्त्याच्या प्लॅनिंग साठी पाच वर्षे लागली तर रस्ता बांधायला सात वर्षे लागली. या पासचे आर्कीटेक्चर म्हणजे एक अजूबा मानले जाते. लियू बाय्जून सांगतात, हा पास तीन एक्स्प्रेसवे ला जोडतो. चालकाच्या सुविधेसाठी २० रँप दिले गेले आहेत. कुणी चुकीच्या रस्त्याला गेलाच तर १० मिनिटात परत फिरण्याची सुविधा येथे आहे. जागोजागी मार्गदर्शिका आहेत त्यामुळे गोंधळ होत नाही.