Women’s World Cup 2025 : भारतात होणार महिला विश्वचषक 2025, चार वर्षात आशिया खंडात होणार आयसीसीच्या तीन स्पर्धा


बर्मिंगहॅम – आयसीसीने 2024 ते 2027 या कालावधीत सर्व प्रमुख स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बर्मिंगहॅम येथे आयसीसीच्या वार्षिक परिषदेत यजमान देशांची नावे निश्चित करण्यात आली. आयसीसी महिला विश्वचषक 2024 पासून सुरू होणाऱ्या चार वर्षांत महिला संघांसाठी चार प्रमुख स्पर्धा होतील, असे आयसीसीने म्हटले आहे. याचे यजमानपद बांगलादेशकडे आहे. ही पहिलीच वेळ आहे की बांगलादेश मोठ्या ICC महिला स्पर्धेचे आयोजन करत आहे आणि दुसऱ्यांदा T20 विश्वचषक आयोजित करत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 23 सामने होणार आहेत.

भारत भूषवणार 2025 विश्वचषकाचे यजमानपद
2025 मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. भारत पाचव्यांदा आयसीसी महिला स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. याआधीही भारताने चार वेळा आयसीसी महिला विश्वचषकाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून एकूण 31 सामने होणार आहेत.

इंग्लंडमध्ये होणार 2026 टी-20 विश्वचषक
ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन इंग्लंडने केले आहे. जून महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत संघांची संख्या 10 वरून 12 होणार असून एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिला टी-20 विश्वचषक पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सीईओ क्लेअर कॉनर यांनी सांगितले की, 2017 मध्ये इंग्लंडला महिला विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आणि इंग्लंड संघ चॅम्पियन बनला. लॉर्ड्सवर अंतिम सामना प्रेक्षकांनी खचाखच भरला होता आणि अशा क्षणी हीदर नाइटने ट्रॉफी उचलली हे मी विसरू शकत नाही.

महिला चॅम्पियन्स ट्रॉफीची श्रीलंकेपासून होणार सुरुवात
महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये प्रथमच खेळली जाणार आहे. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये असेल. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघांमध्ये एकूण 16 सामने होणार आहेत. यासोबतच आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.