बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ने रिलीज होण्यापूर्वीच खळबळ उडवून दिली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसलेल्या कंगनाने तिच्या लूकने सर्वांची बोलती बंद केली होती, तर दिवंगत राजकारणी जय प्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर यांनी सर्वांनाच चकित केले आहे. दरम्यान, भारतरत्न पुरस्कार प्राप्त माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. या व्यक्तिरेखेसाठी श्रेयस तळपदेला कास्ट करण्यात आले आहे.
Emergency : हा अभिनेता मोठ्या पडद्यावर साकारणार तरुण अटलबिहारी वाजपेयींची भूमिका, कंगनाने केला खुलासा
बुधवारी कंगनाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून श्रेयस तळपदेचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणारा श्रेयस तळपदेचा लूक आश्चर्यचकित करणारा आहे. या पोस्टरमध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या तरुण वयाची झलक पाहायला मिळत आहे. श्रेयस तळपदेचा लूक शेअर करताना, कंगनाने लिहिले – ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून श्रेयस तळपदेची भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी म्हणून ओळख करून देत आहे, एक सच्चा राष्ट्रवादी ज्यांचे देशावर प्रेम आणि अभिमान अतुलनीय होता. आणीबाणीच्या वेळी तरुण आगामी नेता कोण होता…
सोशल मीडियावर आपला लूक शेअर करताना श्रेयसने अटलबिहारी वाजपेयींची प्रसिद्ध कविता लिहिली आहे- “बाधाएं आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा.”
अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेतील श्रेयस तळपदेचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. सोशल मीडिया यूजर्स कंगनाच्या पोस्टवर शानदार, वाह, काय निवड, सर्वोत्तम निवड अशा कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले – व्वा, आणीबाणीचे सत्य समोर आणण्यासाठी सर्व उत्कृष्ट कलाकार एकत्र आले. तर दुसऱ्याने लिहिले – आशा आहे की श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेला योग्य न्याय देईल.