बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. फोटो समोर आल्यापासून लोक रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल करत असताना, सेलिब्रिटी वेगवेगळे तर्क देऊन त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण रणवीर सिंगची छायाचित्रे किंवा सेलिब्रिटींची वक्तव्ये लोकांच्या पसंतीस उतरत नाहीत. त्यामुळेच सोमवारी त्याच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आणि आता ‘महिलांच्या भावना दुखावल्या’प्रकरणी मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर लोक रणवीर सिंगच्या अटकेची मागणी करत आहेत.
बोल्ड फोटोशूट रणवीर सिंगला पडले महागात, अटकेची टांगती तलवार
कोणत्या कलमांखाली नोंदवला गेला एफआयआर?
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता रणवीर सिंगविरुद्ध कलम 292 (अश्लील पुस्तकांची विक्री इ.) 293, 509 आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
कोणी केली तक्रार?
एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) चालवणारे ललित श्याम यांनी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. रणवीर सिंगचे असे बोल्ड फोटो पाहिल्यानंतर महिलांच्या मनात लाज निर्माण होईल, असा आरोप ललितने केला आहे. याच कारणामुळे त्याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून रणवीरचे बोल्ड फोटो हटवण्याची मागणीही केली आहे.
होऊ शकतो पाच वर्षे तुरुंगवास
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत 5 वर्षे आणि कलम 293 अंतर्गत 3 वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याच वेळी, आयटी कायदा 67A अंतर्गत, 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. म्हणजेच आरोप सिद्ध झाल्यास रणवीर सिंगला किमान पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.