मुंबई : राज्यसभेच्या जागा आणि राज्यपालपदाचे खोटे आश्वासन देऊन लोकांना 100 कोटींचा गंडा घालणाऱ्या रॅकेटचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये महाराष्ट्रातील लातूरचे कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकातील बेळगावचे रवींद्र विठ्ठल नाईक आणि महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि दिल्ली-एनसीआरचे मोहम्मद एजाज खान अशी नावे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करून शोध मोहिमेदरम्यान एक आरोपी पळून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘100 कोटींमध्ये राज्यपाल, राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन’, सीबीआयने केला रॅकेटचा पर्दाफाश
सीबीआय अधिकारी बनून ते लोकांची करत होते फसवणूक
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंडगर हा सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता. एवढेच नाही, तर तो उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध लोकांसमोर दाखवत होता. तो बुरा, अरोरा, खान आणि नाईक यांना लोकांना काम आणण्यासाठी आमिष दाखवत असे जेणेकरून त्या बदल्यात करोडो रुपयांचे सौदे करू शकतील. एवढेच नाही तर बड्या नेत्यांच्या जवळ असल्याचे भासवून आरोपी लोकांची दिशाभूल करायचे. मात्र, सीबीआयने त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.
राज्यपालांपासून ते राज्यसभेच्या जागांपर्यंतचे आश्वासन
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी राज्यसभेतील जागा, राज्यपालपदी नियुक्ती, केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांतर्गत विविध सरकारी संस्थांमध्ये अध्यक्षपदी नियुक्ती अशी खोटी आश्वासने देऊन खासगी व्यक्तींना फसवण्याचा कट रचला होता.