Elon Musk Affair : गुगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीसोबत एलन मस्कचे अफेअर! आहेत नऊ मुलांचे वडील, प्रत्येकाची आई आहे वेगळी


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क त्याच्या कामासाठी जेवढे ओळखले जातात, तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखले जातात. कामाव्यतिरिक्त त्यांचे अफेअर्सही चर्चेत असतात. मस्क यांच्याबद्दल रोज काही ना काही बातम्या येत असतात. आता गुगलचे सह-संस्थापक सर्गे ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहानसोबत त्याचे अफेअर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

एलन मस्क यांच्यासोबत अफेअर असल्यामुळे सर्गे ब्रिनने आपल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. 15 डिसेंबर 2021 रोजी घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. तथापि, ब्रिन आणि शानाहान पुन्हा एकत्र राहू लागले. आता या अहवालानंतर ब्रिनच्या वकिलाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कसे जवळ आले मस्क आणि शानाहान
मिळालेल्या माहितीनुसार, एलन मस्क आणि गुगलचे सह-संस्थापक सर्जे ब्रिन खूप चांगले मित्र होते. ब्रिनच्या घरी मस्क वारंवार येत असे. यादरम्यान त्यांनी ब्रिनची पत्नी शानाहानशी मैत्री केली आणि हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि अफेअर सुरू झाले. ब्रिनला याची माहिती मिळताच त्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. असे सांगितले जात आहे की मस्क आणि शानाहान यांच्यातील हे अफेअर, तेव्हा सुरू झाले, जेव्हा मस्क आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रिम्स यांचे ब्रेकअप झाले होते.

एकदा मस्कला ब्रिनने केली होती मदत
अहवालानुसार, मस्कची कंपनी टेस्ला 2008 मध्ये आर्थिक मंदीच्या काळात बुडण्याच्या मार्गावर होती. मग मस्कचा मित्र आणि Google सह-संस्थापक ब्रिन यांनी त्याला मदत केली आणि टेस्लाला मंदीत बुडण्यापासून वाचवले. 2015 मध्ये मस्कने ब्रिनला इलेक्ट्रिक कार दिली. मात्र, नंतर त्यांचे नाते बिघडले.

नऊ मुलांचे पिता आहेत मस्क
रिपोर्ट्सनुसार, एलन मस्क सात नव्हे तर नऊ मुलांचे पिता आहेत. आतापर्यंत जगाला त्यांच्या सात मुलांबद्दलच माहिती होती. मात्र, काही दिवसांपूर्वी एलन मस्कच्या कंपनीत काम करणाऱ्या शिवॉन जिलिस या महिला अधिकाऱ्याने दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याचे समोर आले होते. ही मुले मस्क यांची आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा जन्म झाला. बातम्यांनुसार, मस्कचे आतापर्यंत सहा अफेअर्स जगासमोर आले आहेत, ज्यांना नऊ मुले आहेत.