जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्याबाबत नुकताच एक धक्कादायक खुलासा झाला आहे. एलन मस्क यांच्यामुळे गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिनने पत्नी निकोल शानाहान हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. एलन मस्क आणि ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहान यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. मात्र, हे वृत्त एलन मस्क यांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणाले की सर्गेई आणि मी मित्र आहोत आणि काल रात्री एकत्र पार्टीत होतो. मी निकोलला तीन वर्षांत फक्त दोनदा पाहिले आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे संबंध नाही.
Elon Musk Affair : एलन मस्क यांनी गुगलच्या सह-संस्थापकाच्या पत्नीसोबतच्या अफेअरवर दिली ही प्रतिक्रिया
यासंदर्भात वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले आहे की Google सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी पत्नी आणि मस्क यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मात्र आता मस्क यांनी या वृत्ताला निराधार म्हटले आहे.