Aircraft Crashed Video: विमानाचे झाले दोन तुकडे, थोडक्यात बचावली महिला प्रशिक्षणार्थी पायलट


पुणे – महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात आज सकाळी 11.30 च्या सुमारास प्रशिक्षणार्थी विमान एका शेतात कोसळले. 22 वर्षीय महिला पायलट जखमी झाली. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. विमान शेतात पडले, त्यावेळी शेजारीच शेतकरीही काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर तेथे काम करणारे शेतकरी घाबरले असल्याचे लोकांनी सांगितले.

तांत्रिक बिघाडाची शक्यता
या घटनेची माहिती देताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सांगितले की, प्रशिक्षणार्थी पायलटचे नाव भाविका राठोड असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान कार्व्हर एव्हिएशन बारामतीचे आहे. वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान कोसळले.