इराण आणि तुर्की दौऱ्यावर गेले होते नकली पुतीन?

युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी नुकताच इराण आणि तुर्कस्थानचा दौरा केला असल्याच्या बातम्या आल्या आहेत. गेले काही महिने सातत्याने पुतीन यांची तब्येत बरी नसल्याची चर्चा होते आहेच. त्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे गुप्तचर संस्थेचे प्रमुख मेजर जनरल कायरालो बुडानोव यांनी इजिप्त आणि तुर्की दौऱ्यावर पुतीन नाही तर त्यांचा तोतया केला होता असा दावा केला आहे.

एका मुलाखतीत या संदर्भात बोलताना बुदानोव म्हणाले, इराण तुर्कस्थान दौऱ्यावर विमानातून उतरताना दिसणारा माणूस पुतीन आहे का हे जरा बारकाईने पहा. द मिररच्या बातमीनुसार तेहरान येथे आपल्या राष्ट्रपती विमानातून उतरलेले पुतीन काही वेगळेच दिसत होते आणि त्यांची वर्तणूक वेगळी होती. ते अधिक सतर्क होते. शिवाय जॅकेट काढताना आणि गाडीत बसताना सुद्धा त्यांच्या हालचाली वेगळ्या होत्या आणि त्यामुळे हा पुतीन यांचा तोतया होता असे म्हटले जात आहे.

रशियाने यापूर्वी अनेकदा राष्ट्रपतींचे डुप्लीकेट किंवा तोतया वापरले आहेत. स्टॅलीन आणि लियोनीद ब्रेझनेव्ह यांनी अनेकदा असे स्वतःचे तोतये वापरले आहेत. दोन वर्षापूर्वी पुतीन यांच्यासाठी सुद्धा बॉडीडबल म्हणजे तोतया वापरण्याचा विचार केला होता पण पुतीन यांनी त्याला नकार दिला होता असे सांगितले जाते. पुतीन यांनी या दौऱ्यात इराणचे इब्राहीम रईसी आणि तुर्कस्थानचे प्रमुख एर्देनोन यांच्या भेटी घेतल्या आहेत. यात युक्रेन मधून धान्य निर्यात समझोता करण्यास मदत केल्याबद्दल एर्देनोन यांचे आभार पुतीन यांनी मानले होते.