या 10 देशांकडे आहे सर्वाधिक राखीव सोने, भारत आहे या क्रमांकावर

सोने हा धातू आपल्या सर्वांसाठीच किती महत्त्वाचा आहे, आपल्याला माहितीचे आहे. जगात सर्वाधिक प्रमाणात सोने खरेदी करण्यामध्ये भारतीय अव्वल आहेत. ज्या देशाच्या रिझर्व्ह बँक अथवा सेंट्रल बँकेकडे जेवढे अधिक सोने असते, तेवढे त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असते. मात्र भारतात परिस्थिती वेगळी असून, येथे रिझर्व्ह बँके ऐवजी जनतेकडे अधिक सोने आहे.

(Source)

सोने रिझर्व्ह ठेवण्याच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार, अमेरिकेकडे 8,133.5 टन सोने आहे.

(Source)

या यादीत जर्मनी दुसऱ्या स्थानावर असून, जर्मनीकडे 3,367 टन सोने आहे. युरोपियन देशात जर्मनीकडे सर्वाधिक सोने आहे.

(Source)

सोने रिझर्व्ह ठेवण्याच्या यादीत इटली तिसऱ्या स्थानावर आहे. इटलीकडे 2452 टन सोने आहे. इटलीकडे जगाच्या 64 टक्के सोने आहे.

(Source)

फ्रान्स या यादीत चौथ्या स्थानी आहे. फ्रान्सकडे 2436 टन सोने आहे.

(Source)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश असलेल्या रशियाकडे 2228.2 टन सोने असून, रशिया या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

(Source)

सोने रिझर्व्ह ठेवण्याच्या यादीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे. चीनकडे 2141 टन सोने आहे.

(Source)

स्विर्झलँड या यादीत सातव्या क्रमांकावर असून, त्यांच्याकडे 1040 टन सोने आहे.

(Source)

जगातील आकाराने छोट्या असलेल्या देशांपैंकी असलेल्या जापानकडे 765 टन रिझर्व्ह सोने असून, जापान आठव्या क्रमांकावर आहे. 1950 मध्ये जापानकडे केवळ 6 टन सोने होते.

(Source)

नेदरलँड गोल्ड रिझर्व्ह ठेवणाऱ्या देशांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. नेदरलँडकडे 612 टन सोने आहे.

(Source)

गोल्ड रिझर्व्हमध्ये भारत दहाव्या स्थानावर आहे. भारताकडे अधिकृतरित्या रिझर्व्ह सोने 557.7 टन आहे. मात्र रिपोर्टनुसार, भारतीय नागरिक आणि मंदिरांमध्ये याच्या कितीतरी पट अधिक सोने आहे. भारत जगातील सर्वात मोठे सोने आयात देश आहे.

Leave a Comment