चक्क एअरपोर्टप्रमाणे बनवले स्मशानभूमीचे डिझाईन


अहमदाबाद : एका एअरपोर्टच्या थीमवर गुजरातमधील बारडोलीमध्ये एक स्मशानभूमी बनवण्यात आली आहे. एअरपोर्टप्रमाणेच या स्मशानभूमीचे डिझाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अंतिम उड्डाण मोक्ष यात्रा असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

दोन मोठ्या विमानांची प्रतिकृती या स्मशानभूमीमध्ये ठेवण्यात आली असून मोक्ष एअरलाइंस आणि स्वर्ग एअरलाइंस अशी या विमानांची नावे आहेत. या स्मशानभूमीमध्ये ५ चितास्थळ असून त्यापैकी ३ या विद्युत दाहिनी आहेत. याठिकाणी मृतदेहाला अग्नी देताच विमान उडण्याचा आवाज येतो. त्याचबरोबर या स्मशानभूमीमध्ये एअरपोर्टप्रमाणे अनाऊंसमेंट देखील करण्यात येते. या अनाउंसमेंटद्वारे येथे येणाऱ्या लोकांना कोणत्या गेटमधून प्रवेश करायचा आहे हे सांगितले जाते.

Leave a Comment