म्युझियम ऑफ फ्यूचर का बनत आहे कुतूहलाचा विषय ?

फोटोत दिसणारी ही आकृती म्यूझियम ऑफ फ्यूचर म्हणजेच भविष्याचे संग्रहालय आहे. दुबईत बनणाऱ्या यी इमारतीचे फ्रेमवर्क आयातकार 2400 स्टीलच्या रॉड्सपासून तयार करण्यात आले आहे. हा ढांचा मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये तयार करण्यात आलेला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत या ढाच्यावर केवळ पॅनेल लावण्याचे काम सुरू आहे. हे संग्रहालय एक वर्षात सुरू होणार आहे. ही इमारत बनविणाऱ्यांना विश्वास आहे की, ऑक्टोंबर 2020 पर्यंत हे संग्रहालय लोकांसाठी सुरू होईल. त्याच वेळी दुबईत वर्ल्ड एक्स्पो होणार आहे.

म्यूझियम ऑफ फ्यूचरचे कार्यकारी संचालक लॅथ कार्सलन सांगतात की, या इमारतीचा आकार डोळ्यांप्रमाणे आहे. ही बिल्डिंग तयार करण्याचा कॉन्ट्रॅक्ट 2015 मध्ये दुबईच्या किला डिझाईन कंपनीला मिळाला होता. दुबईमध्ये शेकडो इमारती आहेत, मात्र म्यूझियम ऑफ फ्यूचर एकदम हटके आहे.

(Source)

म्यूझियम ऑफ फ्यूचरचे वैशिष्ट्य –

याच्या ढाच्याच्या वरती जे पॅनेल लावण्यात आलेले आहेत. त्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिण्यात आलेले आहे. मात्र अधिकृतरित्या यावर काय लिहिण्यात आलेले आहे हे सांगण्यात आलेले नाही. शक्यता आहे की, यावर दुबईचे शासक शेह मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी लिहिलेल्या कविता असतील. या संग्रहालयाची उंची 78 मीटर आहे. यामध्ये प्रकाश यावा यासाठी चौदा किमी लांब एलईडी लाईट्स लावण्यात येणार आहे.

हाताने लिहिण्यात आलेल्या या कविता आणि या इमारतीच्या आकारने निर्मात्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प्रत्येक स्टील फ्रेम, पॅनेल विशेष आकारतच कापले जात आहे. ब्रिटनची ब्यूरोहॅपोल्ड इंजिनिअरिंग कंपनी ही इमारत बनविणारी प्रमुख सल्लागार कंपनी आहे. या इमारतीचे डिझाईन बिल्डिंग इंफॉर्मेंशन मॉडेलिंगद्वारे तयार करण्यात आले आहे. हे डिझाईन आर्टिफिशियल इंटेलिजेंसीद्वारे तयार केले जाते. जेणेकरून प्रत्येक ठिकाणी एक विशेष गोलाकाराचा अंदाज घेता येईल.

(Source)

ब्यूरोहॅपोल्ड इंजिनिअरिंगचे टोबाइस बॉली सांगतात की, रेखाचित्राद्वारे हे डिझाईन तयार करणे शक्य नाही. आम्हाला प्रत्येक गोष्ट डिजिटल पद्धतीने करायची होती. तंत्रज्ञानाच्या मदतीनेच एवढ्या सहज पद्धतीने आम्ही निर्मिती करू शकतो.

सुरूवातीला प्रोजेक्ट डायरेक्टरने बिल्डिंगचे 2डी मॉडेल तयार केले. छोटे छोटे बदल करण्यासाठी देखील कॉम्प्यूटरची मदत घ्यावी लागली. मशीनच्या मदतीनेच स्टीलची फ्रेम तयार करण्यात आली. कॉम्प्यूटर डिझाईनवर आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारेच काम करण्यात आले.

(Source)

अडचण अशी होती की, इमारतीचे जे डिझाईन होते, त्यामध्ये फीट बसणारा कोणताही स्टीलचा ढाचा नव्हता. यासाठी इंजिनिअर्सनी स्वतःचेच एल्गोरिद्म लिहिले. त्यामुळे इंजिनिअर्संना स्वतःच्या गरजेनुसार स्टीलला बदलावे लागले नाही. कॉम्प्यूटरवर डिझाईन तयार केल्याने ढाचा उभा करताना स्टीलचा एक देखील तुकडा कापावा लागला नाही. थ्री-डी मॉडेलिंगच्या मदतीने इमारतीच्या आतील पाण्याचा प्रभाव आणि इलेक्ट्रिक वायरिंगची डिझाईन देखील अतिशय काळजीपुर्वक करण्यात आली.

(Source)

आता इमारतीचा 70 टक्के ढाचा पुर्ण झालेला आहे. सात मजली इमारतीवर अरबी भाषेत लिहिलेले पॅनेल लावले जात आहेत. एकूण 1024 पॅनेल लावले जाणार आहेत. प्रत्येक पॅनेलला खास इमारतीसाठी तयार करण्यात आले आहे. इमारत बनवताना एअर कंडिशनिंग आणि प्रकाशाची देखील काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे इमारतीला LEED प्लेटिनम रेटिंग मिळाली आहे. येथे येणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांना चार्ज करता येईल. याशिवाय बिल्डिंगमध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आहे.

(Source)

दरवर्षी 10 लाख पर्यटक म्यूझियम ऑफ फ्यूचरला भेट देतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment