बहुगुणकारी वांगे


वांग्यामध्ये प्रथिने, डायटरी फायबर आणि क्षार मुबलक मात्रेमध्ये असतात. सुंदर जांभळ्या किंवा हिरव्या रंगाची ही फळभाजी. या मध्ये कोलेस्टेरोल कमी करणारी तत्वे भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी या फळभाजीची मदत होऊ शकते. या शिवाय इतरही काही आरोग्यकारी गुण वांग्यामध्ये आहेत. वांग्यामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असते जे शरीरामधील फ्री रॅडीकल कमी करण्यास मदत करते. फ्री रॅडीकल मुळे शरीरातील पेशींना नुकसान होत असते. अश्या फ्री रॅडीकल मुळे संभवणारा त्रास वांग्याच्या सेवनामुळे कमी होऊ शकतो. त्याच बरोबर वांग्यामुळे ldl कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत मिळते.

वांग्यामध्ये असलेले नॅसनीन हे अँटी ऑक्सिडंट तत्व आहे. या मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊन शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. वांग्यामध्ये असलेले डायटरी फायबर लवकर भूक शमविण्यास मदत करते. त्यामुळे पुष्कळ वेळ पोट भरलेले राहत असल्यामुळे पुन्हा पुन्हा खाणे टाळले जाऊ शकते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment