या प्राणी संग्रहालयात चक्क पर्यटकांनाच बंद केले जाते पिंजऱ्यात

तुम्ही अनेकदा प्राणी संग्रहालयात गेला असाल, जेथे प्राणी, जीव-जंतूना पिंजऱ्यामध्ये बंद केले जाते व त्यांना पाहण्याची संधी मिळते. मात्र जगात असे एक प्राणी संग्रहालय आहे, जेथे प्राण्यांना नाही तर लोकांना पिंजऱ्यात बंद केले जाते व प्राणी त्यांना हवे तसे फिरत असतात.

(Source)

ऐकण्यास हे तोडे विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे. या प्राणी संग्रहालयात प्राण्यांऐवजी पर्यटकांनाच पिंजऱ्यात बंद केले जाते. हे प्राणी संग्रहालय चीनमध्ये असून, याचे नाव लेहे लेदू वाइल्डलाइफ झू असे आहे.

(Source)

हे प्राणी संग्रहालय 2015 मध्ये सुरू करण्यात आले होते. येथे पर्यटक आपल्या हाताने प्राण्यांना खायला घालतात. पर्यटकांनी भरलेले पिंजरे प्राण्यांच्या जवळ नेले जातात. खाण्यासाठी प्राणी पिंजऱ्याजवळ येतात. कधीकधी पिंजऱ्याच्या वरती देखील चढतात.

(Source)

या प्राणी संग्रहालयाच्या संरक्षकांचे म्हणणे आहे की, आम्ही आमच्या पर्यटकांना सर्वात वेगळा आणि थरारक अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एखादा प्राणी पाठलाग करतो, त्यावेळी येणारा अनुभव आम्ही येणाऱ्या पर्यटकांना देऊ इच्छितो.

(Source)

या ठिकाणी पर्यटकांना सुरक्षेचा सुचना देण्यात येतात. याशिवाय सुरक्षेसाठी अनेक गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे. कॅमेऱ्याद्वारे पिंजरा आणि प्राण्यांवर 24 तास लक्ष ठेवले जाते व कोणत्याही आणीबाणीच्या प्रंसगात 5-10 मिनिटात मदत पोहचवली जाते.

Leave a Comment