उच्च रक्तदाब नियंत्रणात कसा ठेवाल?


२०१३ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘ ग्लोबल ब्रीफ ऑफ हायपरटेन्शन ‘ मध्ये उच्च रक्तदाब हा आता ‘ पब्लिक हेल्थ क्रायसिस’ म्हणजे समाजातील वाढीला लागल्या आजारांपैकी प्रमुख आजार आहे असे म्हटले गेले आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, किडनी निकामी होणे, याचबरोबर अकाली मृत्यू होण्याचाही धोका असतो. मुळात, कित्येक व्यक्तींना आपल्याला उच्चाराक्तादाबाचा विकार आहे हेच मुळी माहित नसते, कारण तसा कुठल्याच प्रकारचा त्रास त्यांना कधीही जाणाविलेला नसतो. पण त्यातही चांगली गोष्ट अशी की उच्च रक्तदाब होण्यापासून रोखणे आणि जर तो झालाच तर तो नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. त्यासाठी काही घरगुती पण प्रभावी उपाय आहेत.

आपल्या आहारामध्ये लसूण समाविष्ट करा. लसूण खाल्ल्याने शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड तयार होते. या दोन्ही तत्वांमुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि वात नाहीसा होण्यास मदत मिळते. हृदयावरील अतिरिक्त तणाव कमी होण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. तसेच शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी ही उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास अतिशय फायेकारक आहे. यामध्ये असलेले क जीवनसत्त्व, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आणि शरीरातील इतर स्नायूंना बळकटी देतात. उच्च रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी शहाळ्याचे पाणी घ्यावे.

आपल्या आहारामध्ये पोटॅशियम ची मुबलक मात्रा असलेले खाद्यपदार्थ समविष्ट करा. पोटॅशियम मुळे शरीरातील सोडीयमचे ( मिठाचे ) प्रमाण नियंत्रणात राहते. केळी, किशमिश ( बेदाणे ), पालक, रताळी या मध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे, त्यामुळे या खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा.

जास्वंदीची पाने वाळवून, त्याची पूड करून, ती पूड घालून उकळलेला चहा घेतल्यानेही उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. जास्वंद ही लघवीचे प्रमाण वाढविणारी, म्हणजेच डाययुरेटिक आहे. जास्वंदीच्या पानाची पूड, एक दालीचीनिचा लहानसा तुकडा आणि मध पाण्यात घालून उकळून, हा चहा दिवसातून दोन वेळा घ्यावा. ह्या चहाच्या सेवनामुळे हृदयातील arteries ( धमन्या ) वर पडत असलेला ताण कमी होऊ शकतो.

उच्च रक्तदाबाचा विकार दहा हात लांब ठेवावयाचा असल्यास धुम्रपान आणि मद्यपान वर्ज्य करायला हवे. तसेच आहारावर योग्य नियंत्रण आणि नियमित व्यायामाची जोड मिळाली तर उच्च रक्तादाबावर नियंत्रण मिळविणे कठीण नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment