अद्भुत, अविश्वसनीय ..


संगणक ज्यांच्या कामाचा अविभाज्य भाग आहे अश्या मंडळींनी लॅरी टेसलर या व्यक्तीचे आभार मानावयास हवेत, कारण लॅरी टेसलरने संगणकावर काम करीत असताना माहितीच्या देवघेवीसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या “ कॉपी आणि पेस्ट “ या पद्धतीचा शोध लावला. या पद्धतीमुळे संगणक वापरणाऱ्या असंख्य व्यक्तींचे, विशेष करून विद्यार्थ्यांचे काम अगदी सोपे होऊन गेले.

जर्मनी मधील “ फुगेराय “ या गावामधील घरांचे घरभाडे सन १५२० पासून वाढलेलेच नाही. आजही या गावामध्ये केवळ ८८ युरो सेंट्स एवढे भाडे देऊन वर्षभरासाठी घर भाड्याने घेता येऊ शकते.

डॉल्फिन मासे समुद्रामध्ये संकटात सापडलेल्या मनुष्यांच्या मदतीला येत असल्याचे पाहिले गेले आहे. अमेरिकेमधील कॅलिफोर्निया येथे हे आश्चर्य घडले आहे. येथे राहणारा एक मनुष्य समुद्रामध्ये पोहण्यास गेला असता त्याच्यावर अचानक एका शार्कने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही डॉल्फिन माश्यांनी त्या शार्कच्या तावडीतून त्या मनुष्याची सुटका करत त्याला सुखरूप समुद्र किनार्यापर्यंत नेऊन सोडले.

फिनलंड येथे वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंड केला जातो. हा दंड नियमांचे उल्लंघन करणार्यांच्या आर्थिक मिळकतीवर अवलंबून असतो. त्यामुळे उच्चवर्गीय व्यक्तींनी नियम मोडल्यास त्यांना दंडही भरपूर मोठा भरावा लागतो.

Leave a Comment