आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी जिरे


जिरे आपल्या आरोग्यास अतिशय हितकारक आहेत. जिरे आहारात समाविष्ट केल्याने शरीराची पचनशक्ती सुधारते. जिऱ्यामध्ये असणारा थायमोल हा कंपाऊंड, आणि त्या व्यतिरिक्त असलेल्या इतर ऑईल्स मुळे लाळग्रंथी सक्रीय होतात, ज्याच्या परिणामस्वरूप पचन सुधारते. जर एखाद्या व्यक्तीला अपचनाचा त्रास होत असेल तर त्याने दिवसातून दोन ते तीन वेळेला जिऱ्याचा काढा घ्यावा. हा चहा कसा बनवाल? – एक कप पाण्यामध्ये एक टेबलस्पून जिरे घालावे. हे पाणी उकळून घेऊन, गळावे आणि गरम असतानाच प्यावे. असा हा जिऱ्याचा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास अपचनाची तक्रार दूर होईल.

ज्यांना बद्धाकोष्ठाची किंवा मूळव्याधीची तक्रार असेल त्यांनी जिऱ्याचे सेवन करावे. जिऱ्यामध्ये फायबर असल्याने अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच जिऱ्यामुळे शरीरामध्ये एनझाइम्स चे स्राव प्रोत्साहित केले जातात. जिरे हे प्राकृतिक रेचक असल्यामुळे बद्धकोष्ठ किंवा मूळव्याधीच्या त्रासासाठी जिरे अतिशय गुणकारी आहेत. बद्धकोष्ठाकरिता जिरे घ्यावयाचे झाल्यास एक टेबलस्पून जिरे तव्यावर थोडेसे भुरकट होईपर्यंत भाजावेत, आणि गार झाल्यावर त्याची बारीक पूड करावी. ही पूड मधामध्ये मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी.

जिऱ्या मध्ये असलेल्या anti bacterial आणि anti inflammatory तत्वांमुळे सर्दी पडसे झाले असल्यास जिऱ्याचा विशेष लाभ होतो. जिऱ्या मुळे घशाला आतून सूज आली असल्यास, ती कमी होण्यास मदत होते, त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती ही वाढते. सर्दी पडसे झाले असल्यास एक ग्लास पाण्यामध्ये एक टेबलस्पून जिरे घालावेत. त्यामध्ये थोडेसे आले किसून घालावे. मग हे मिश्रण उकळून, गाळून घ्यावे आणि हा काढा दिवसातून दो ते तीन वेळा घ्यावा.

गर्भवती महिलांसाठी जिरे अतिशय गुणकारी आहेत. गर्भारपणामध्ये स्त्रीयांना बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो, तसेच, वरचेवर मळमळणे, किंवा उलटी आल्यासारखे वाटत राहते. अश्या वेळी जिऱ्याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो. एक ग्लास गरम दुधामध्ये अर्धा टेबलस्पून जिऱ्याची पूड आणि मध घालून प्यायल्यास फायदा होतो. तसेच ज्यांना निद्रानाशाचा विकार असेल किंवा काही कारणाने रात्री व्यवस्थित झोप लागत नसेल, अश्या व्यक्तींनी अर्धा चमचा जिऱ्याची पूड, एका कुस्करलेल्या केळ्यामध्ये मिसळून खावी. जिऱ्यामध्ये असलेले मेलाटोनीन नावचे तत्व झोप येण्यास मदत करते.

मध आणि जिऱ्याची पूड घालून तयार केलेला फेस पॅक वापरल्यामुळे त्वचा चमकदार तर होतेच, पण त्याशिवाय अतिशय मुलायमही होते. चेहऱ्यावर सूज येत असल्यासही हा फेस पॅक सूज हटविण्यास मदत करतो. हा फेस मास्क बनविण्यासाठी पाव चमचा हळद, अर्धा चमचा जीऱ्याची पूड, आणि एक टेबलस्पून मध एकत्र करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर दहा मिनिटे लावून ठेवावे. दहा मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. हा फेस मास्क आठवड्यातून दोनदा वापरावा. केसांच्या वाढीसाठी आणि केस चमकदार होण्यासाठी जिऱ्याचा वापर करावा. २०० मिलीलीटर पाण्यामध्ये एक टेबलस्पून जिरे आणि एका अंड्याचा पांढरा भाग असे घालून, ते मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट केसांवर लावून ती सुकू द्यावी. त्यानंतर पाण्याने केस धुवावेत. ह्या पेस्टमुळे केस घनदाट आणि चमकदार होतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment