एका दमात वाचून दाखवाल का या क्रिकेटपटूचे नाव ?


जगभरातील अनेक क्रिकेटपटू हे आपल्या फलंदाजीसाठी किंवा गोलंदाजीसाठी नावारुपास आले आहेत. एखादा क्रिकेटपटू हा सर्वात जास्त धावांसाठी, सर्वाधिक चौकार-षटकारांसाठी तर गोलंदाज हा त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे प्रसिद्धीच्या झोतात येतात. अनेक क्रिकेटपटूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहेत. त्यात भारतीय क्रिकेटपटू वरचढ आहेत. पण एखाद्या खेळाडूच्या नावाचा विक्रम देखील होऊ शकतो, असे कधी तुमच्या ऐकण्यात आले आहे का ? पण हे खरे आहे एक क्रिकेटपटूच्या नावाचा चक्क विक्रम आहे.

एका क्रिकेटपटूचे आडनाव एवढे भल्लमोठे आहे की त्याच्या नावावर हा एक विक्रमच आहे. 1947-48 आणि 1953-54मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फिजीचे क्रिकेटपटू आय. एल. बुला. क्रिकेटपटू बुला यांनी खेळण्यास सुरुवात केली. त्यांचे नाव एवढे मोठे होते की, आय. एल. बुला असे टोपणनाव त्यांनी करून घेतले.

Ilikena Lasarusa Talebulamaineiilikenamainavaleniveivakabulaimainakulalakebalau असे फिजीचे क्रिकेटपटू बुला यांचे खरे नाव आहे. हे नाव तुम्ही देखील एका दमात वाचू शकणार नाही. विशेष म्हणजे या आडनावाला एक अर्थही असून हे आडनाव लाऊ बेट समूहाशी संबंधीत आहे. लाऊ ग्रुपमधील (लाऊ भेटसमूह) लॅकेबा बेटावरच्या नंकुला हॉस्पिटलमधून जिवंत परत आला, असा याचा अर्थ आहे. तुम्हाला हे आडनाव वाचून कळणार नाही की नक्की काय गोलमाल आहे. पण हे आडनाव फार जून्या काळातील आहे.

Leave a Comment