“ पाव “ आणि त्यामागचा इतिहास ..


मस्त पाऊस पडत असावा, गरमागरम चहा किंवा कॉफीचा कप समोर असावा आणि पेटपूजा करण्यासाठी “अस्सल मराठी” म्हणविणारा वडापाव..या न्याहारीची रंगत काही औरच. “वडापाव” मधील पावाचे आगमन भारतात कसे झाले त्याबद्दल थोडेसे..आपल्या अस्सल मराठमोळ्या वडापावा मधील “पाव” हा मात्र पोर्तुगीज मंडळींबरोबर भारतात आला. त्या काळी भारतामध्ये गव्हाची रोटी (पोळी) प्रचलित होती.

मुघल भारतामध्ये आल्यानंतर मैदा ही प्रचलनात येऊन “नान” सारखे पदार्थ पसंत केले जाऊ लागले. पण पोर्तुगीज भारतात आले तेच मुळी अश्या प्रांतात, जिथे भात जास्त होत असे. त्यामुळे पोर्तुगीज खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला “पाव” त्यांना मिळणे दुरापास्त होऊन गेले. गव्हाचे पीठ जरी भारतामध्ये उपलब्ध असले तरी ते भिजवून फुगाविण्याकरिता लागणारे यीस्ट भारतामध्ये कुठेही मिळत नसे. तेव्हा पोर्तुगीझांनी एक युक्ती शोधून काढली. गव्हाचे पीठ फुगाविण्यासाठी त्यांनी यीस्ट ऐवजी ताडी वापरली आणि पाव तयार केला. अश्या रीतीने पावाचे भारतामध्ये आगमन झाले. तेव्हा पासून तयार होत असलेला पाव आपले स्वरूप थोडे फार बदलत आता आपल्या सगळ्यांच्याच घरात येऊन पोचला आहे. आणि एवढच नाही तर वडापाव, पावभाजी अशा चमचमीत पदार्थांद्वारे सगळ्यांचेच मन जिंकून घेत आहे.

Leave a Comment