अनेकदा आपल्याकडून घराची अथवा गाडीची चावी हरवत असते. अशावेळेस आपण त्वरित दुसरी चावी तयार करून घेतो. मात्र एका तिजोरीची चावी बनविण्यासाठी तब्बल 3 दिवस लागल्याची घटना घडली आहे.
100 वर्ष जुन्या तिजोरीची हरवलेली चावी बनविण्यासाठी लागले तब्बल 3 दिवस
गुजरातमधील महिधपुरा येथे राहणाऱ्या जय रूवाला यांच्या पणजोबांनी इंग्लंडवरून मागवलेल्या तिजोरीची चावीच हरवली. ही तिजोरी 100 वर्ष जूनी असून, याचे वजन 200 किलो आहे. तिजोरीची लांबी 2 फूट, रूंदी 1.5 फूट आणि उंची 2.5 फूट आहे. तिजोरी फायरप्रुफ असून, आग लागली तरी देखील आतील सामानाला कोणतेही नुकसान होत नाही. अखेर या 100 वर्ष जुन्या तिजोरीची चावी बनविण्यासाठी तब्बल 3 दिवस लागले.
रूवाला परिवाराला वारसा म्हणून ही तिजोरी मिळालेली आहे. याच्या दरवाजाची जाडी 6 इंच आहे. 12 जणांनी मिळून प्रयत्न केला तरी ही तिजोरी उचलली जात नाही. लोखंडाच्या सळाईने सरकवण्याचा प्रयत्न देखील अपयशी ठरला.