मोहमद शमीने खरेदी केली १ कोटींची जग्वार एफ टाईप कार

टीम इंडियाचा मोहम्मद शमी त्याच्या वेगवान गोलंदाजीबद्दल ओळखला जातो. शमीची कार पसंती सुद्धा त्यामुळे वेगाला समर्पक अशीच असते. त्याला स्पोर्ट्स कारची प्रचंड आवड आहे आणि त्याने अशीच एक वेगवान कार स्वतःच्या कार ताफ्यात सामील केली आहे. मोहम्मद शमीने जग्वार एफ टाईप स्पोर्टी कार नुकतीच खरेदी केली असून ही कार जेएलआर सेग्मेंटच्या सर्वाधिक वेगवान कार्स मधली एक मानली जाते.

शमीने लाल रंगाची जग्वार खरेदी केली असून भारतात ही कार २०२० मध्ये प्रथम सादर झाली आहे. जग्वारची ही कार नऊ व्हेरीयंट मध्ये आणि अनेक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करून दिली गेली होती. या नऊ मध्ये सहा कुपे तर ३ कन्व्हर्टीबल ऑप्शन आहेत. स्मूथ एलईडी हेडलाईट या कार्सना दिले गेले आहेत.

शमीने घेतलेल्या मॉडेलसाठी २.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून ० ते १०० किमीचा वेग ती ४.४ सेकंदात घेते. तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी २८५ किमी. या कारसाठी ८ स्पीड ऑटोगिअर बॉक्स आहे. शमीने यापूर्वी नुकतीच रॉयल एन्फिल्ड गीटी ६५० बाईक सुद्धा खरेदी केली आहे.