माजी राष्ट्रपती बनतात या नंबरचे नागरिक
भारतात राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात. आता १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्यामुळे त्या देशाच्या पहिल्या नागरिक बनतील. अश्या वेळी माजी राष्ट्रपती देशात पाचव्या नंबरचे नागरिक बनतात. गृह मंत्रालयाकडे कोणती व्यक्ती देशातील कोणत्या नंबरची नागरिक याची यादी असते. आपल्या देशात नागरिकांसाठी २७ नंबर यादीत सामील आहेत. देशातील सर्वसामान्य जनता ही २७ नंबरची नागरिक असते.
या यादीत पहिले नागरिक राष्ट्रपती, दुसरे नागरिक उपराष्ट्रपती, तिसरे पंतप्रधान, चौथे राज्यपाल आणि पाचवे स्थान माजी राष्ट्रपती, देशाचे उपपंतप्रधान यांचे असते. या यादीत सहाव्या स्थानावर मुख्य न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, सातव्या स्थानावर केंद्रीय कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, नीती आयोग मुख्य, माजी पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि भारतरत्न सन्मानित व्यक्ती येतात. आठव्या स्थानावर राजदूत तर नवव्या क्रमांकावर सर्वोच्च न्यायालयाचे जज, युपीएससी अध्यक्ष, निवडणूक आयोग प्रमुख, महालेखापाल यांचा समावेश होतो.
या यादीत चौदाव्या स्थानी राज्यांचे विधानसभा अध्यक्ष, हायकोर्ट जज असतात तर १५ व्या स्थानी राज्य कॅबिनेट मंत्री असतात. त्यामुळे आता २५ जुलै नंतर रामनाथ कोविंद देशाचे पाच नंबरचे नागरिक बनतील.