ऋषी सुनक यांच्या स्वप्नावर पाणी फिरविणार लीस ट्रस?

ब्रिटनच्या पंतप्रधान पद निवडणुकीत सातत्याने आघाडीवर राहिलेले माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न अपुरे राहणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. याला कारणीभूत ठरले आहे नवे सर्व्हेक्षण. या रेस मध्ये आता ऋषी सुनक आणि माजी परराष्ट्र मंत्री लीस ट्रस या दोघांच्यात लढत होत आहे. डेटा विश्लेषक कंपनी युगोवने ताज्या सर्व्हेक्षणात कन्झर्वेटिव्ह पार्टी सदस्यांनी या रेसमध्ये सूनक आणि ट्रस या दोघानाही पार्टी नेतृत्वासाठी प्रतिस्पर्धी अंतिम चरण मतदान सुरु केले आहे.

४ ऑगस्ट पासून सुरु झालेले हे मतदान सप्टेंबर सुरवातीपर्यंत होत राहील आणि त्यातून पंतप्रधान निवडला जाईल. हा काळ सुनक यांना अवघड जाईल असे संकेत मिळत आहे. कारण आत्तापर्यंतच्या मतदानात ट्रस यांनी १९ नंबर अधिक मिळविले आहेत. सर्व्हेक्षणात कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या ७३० सदस्यांपैकी ६२ टक्के कल ट्रस यांच्या बाजूने असल्याचे दिसले आहे. शिवाय माजी पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी प्रथमपासून लीस ट्रस यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या १.६० लाख मतदारांना आपल्या पारड्यात मत टाकण्यास प्रवृत्त करण्याचे अवघड काम सुनक यांना पार पाडावे लागणर आहे. यात सुनक यशस्वी होणार का याची जगभरात उत्सुकता आहे.