चित्रपट अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान हे सिद्धू मूसवाला बनतील, असे या धमकीत म्हटले होते. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनीच सलमान खान आणि सलीम खान यांना ही धमकी मिळाली होती. तेव्हापासून सलमानची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
अभिनेता सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?
त्याचवेळी या धमकीनंतर सलमान खानने स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्राच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. यासंदर्भात आज समलान खान यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली. एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, कमिशनरने त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याला कोणत्या प्रकारच्या धमक्या आल्या आहेत आणि त्यानंतर सलमान खानला त्याच्या सुरक्षेबद्दल सांगितले. तसेच एसबीच्या अहवालात काय म्हटले आहे याची माहिती दिली.