के एल राहुल आता करोनाच्या विळख्यात

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर के एल राहुल आता करोनाच्या विळख्यात अडकला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राहुलला करोना झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. राहुल काही दिवसांपासून क्रिकेट मैदानावर नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये तो सध्या रीहॅबिलीएशन उपचार घेत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी २० सिरीज मध्ये त्याची निवड झाल्याची घोषणा झाली होती. पण आता त्याचा या सिरीज मधील सहभाग फिटनेस पाहून मगच नक्की होणार आहे असे समजते.

राहुलचा एक व्हिडीओ नुकताच आला होता ज्यात भारतीय महिला क्रिकेट खेळाडू झुलन गोस्वामी त्यांना नेट मध्ये बोलिंग करताना दिसली होती. आयपीएल नंतर राहुल खेळलेला नाही. द. आफ्रिकेच्या स्थानिक सिरीजसाठी त्याला कप्तान निवडले गेले होते मात्र सिरीज सुरु होण्यापूर्वी काही तास अगोदर राहुल जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर जर्मनी येथे यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली असून तो भारतात परतला आहे. राहुलने गुरुवारी बंगलोर येथे राष्ट्रीय क्रीडा अकादमीच्या लेवल ३ कोच सर्टिफिकेट कोर्स मध्ये भाग घेतलेल्या उमेदवारांसमोर भाषण दिले तेथेच त्याला करोना बाधा झाली असावी असा अंदाज आहे. राष्ट्रकुल खेळात भारतीय टीम मध्ये सामील महिला खेळाडू करोना संक्रमित होती अशी चर्चा आहे.