रणवीरचे मासिकासाठी न्यूड फोटो शूट

आपल्या विचित्र कपडे आणि विचित्र फॅशन मुळे चर्चेत राहणारा बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आता कपडे नसलेल्या फोटो शूट मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्थात आपल्या अजब फॅशनवर कितीही टीका केली गेली तरी त्याला मुळीच किंमत न देणारा रणवीर सिंह न्यूड फोटो शूट वरून होत असलेल्या कॉमेंट्स कडेही दुर्लक्ष करेल असेच दिसत आहे.

कितीही चेष्टा झाली तरी फॅशनशी तडजोड नाही अशी रणवीरची ख्याती आहे. त्याने एका पेपर मॅगझिन साठी न्यूड फोटो शूट केला असून हे फोटो इंटरनेट वर वेगाने व्हायरल झाले आहेत. एका तुर्की गालिच्यावर दिगंबर अवस्थेत पहुडलेला, कुठे उभा राहून पोझ देणारा रणवीर यात दिसतो आहे. त्याचा एक फोटो बर्ट रेनोल्डस वरून प्रेरित होऊन घेतला गेला आहे. कारण बर्ट ने याच मासिकासाठी न्यूड फोटो शूट केले होते.

या मासिकाला रणवीरने मुलाखत सुद्धा दिली आहे. त्यात त्याने फिजिकली नेकेड होणे त्याच्यासाठी काही अवघड नाही असे म्हटले आहे. तो म्हणतो,’ माझ्या काही परफोर्म्सनी मला तसेही नागडे केलेच आहे. आता तुम्ही माझा आत्मा पाहू शकता. हजार लोकांसमोर नेकेड होताना मला काही फरक पडत नाही.’