न्यूझीलंडच्या मिचेलने पहिल्याचा सामन्यात रचला इतिहास

न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल ब्रेसवेल याने आंतरराष्ट्रीय टी २० सिरीज मध्ये पहिल्याच सामन्यात इतिहास रचला असून पहिल्याच ओव्हर मध्ये हॅटट्रिक केली आहे. ऑफस्पिनर मिचेलने आयर्लंड विरुध्द दुसर्या टी २० सामन्यात ही कामगिरी नोंदविली. त्याच्या करियरचा हा दुसरा सामना होता पण पहिल्या सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नव्हती. त्याने पाच चेंडू मध्ये तीन विकेट घेऊन न्यूझीलंडला ८८ धावांनी विजय मिळवून दिला.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट गमावून १७९ धावा केल्या होत्या. आयर्लंडला १३.५ ओव्हर मध्ये ९१ धावा करता आल्या. यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड २-१ ने आघाडीवर आहे.

३१ वर्षीय मिचेलने पहिल्या सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. या सामन्यात तो गोलंदाजी साठी आला तेव्हा आयर्लंडचा स्कोर ७ विकेटवर ८६ धावा असा होता. मिचेलच्या ओव्हर मधील पहिल्या चेंडूवर मेगर्थीने चौकार मारला. दुसर्या चेंडूवर एक धाव घेतली. पण तिसऱ्या चेंडूवर मार्क एडायर झेल देऊन बाद झाला. त्याच्या पाठोपाठ पुढच्या चेंडूवर मेगर्थी झेल देऊन बाद झाला तर नंतर पाचव्या चेंडूवर क्रेग यंगने शॉट मारला पण त्याचा झेल पकडला गेला. न्यूझीलंडतर्फे हॅट्रिक नोंदविणारा मेचेल हा तिसरा खेळाडू आहे.

यापूर्वी जॅकब ओरम आणि टीम साउदी यांनीही हॅटट्रिक केली आहे.