महाराष्ट्रात 100 कोटीत बना कॅबिनेट मंत्री! ठगांची थेट आमदाराशी बातचीत, चौघांना अटक


मुंबई : महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन पंधरवडा उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशा परिस्थितीत काही ठगांनी एका आमदाराला मंत्री करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा कट रचला. एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई गुन्हे शाखेने रियाझ शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी या चार आरोपींना अटक केली आहे. अधिवक्ता अजय उमापती दुबे यांनी सांगितले की, किल्ला कोर्टाने सर्व आरोपींना 26 जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. एफआयआरनुसार आमदाराला कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली बैठक

  • मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी किल्ला कोर्टात दिलेल्या रिमांड अर्जात या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला.
  • 17 जुलै रोजी रियाज शेख यांनी आमदार सचिवांना अनेकवेळा फोन करून सांगितले की, आज 4 वाजता आमदाराची बैठक आहे, मात्र ते फोन उचलत नाहीत.
  • दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांची त्यांच्या सचिवासोबत सायंकाळी साडेचार वाजता बैठक ठरलेली होती.
  • सेक्रेटरींनी रियाजच्या वारंवार कॉल्सबाबत सांगितले. रियाझने 12 जुलैला फोन करून तुम्हाला 100 कोटी रुपयांत कॅबिनेट मंत्री बनवतो, असे सांगितल्याचे आमदाराने सांगितले.
  • आमदाराने रियाझला सचिवांमार्फत सायंकाळी 5:15 वाजता हॉटेल कॅफेमध्ये भेटण्यास सांगितले.
  • तेथे रियाझ यांनी आमदारासोबत प्रदीर्घ भेट घेतली.

केली 18 कोटी रुपयांची आगाऊ मागणी

  • रियाझने 90 कोटी रुपयांचा सौदा निश्चित केला, परंतु 18 कोटी रुपये आगाऊ मागितले.
  • आमदारांनी दुसऱ्या दिवशीपर्यंत वेळ घेऊन हा प्रकार आपल्या सचिवांना सांगितला.
  • रियाजला 18 जुलै रोजी दुपारी 1:15 वाजता नरिमन पॉइंट येथे बोलावण्यात आले आणि मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाला माहिती देण्यात आली.
  • रियाझ तिथे पोहोचल्यावर आमदार त्याला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले.
  • साध्या गणवेशातील गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले आणि रियाजला अटक केली.
  • त्याच्याकडे चौकशी केली असता, उर्वरित आरोपींची नावे पुढे आली.

मोबाईल आणि सिमकार्ड जप्त

  • रियाजने गुन्हे शाखेला सांगितले की, योगेशने त्याची सागरशी ओळख करुन दिली होती.
  • एका आमदाराला मंत्री बनवण्याचा दर दिल्लीत 50 ते 60 कोटी आहे, असे सांगवई म्हणाले होते.
  • योगेशने रियाजकडून आमदाराचा बायोडाटा मागून सागरला व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केला होता.
  • सागरने चौकशीत जाफर उस्मानी हा सूत्रधार असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेने त्याला अटकही केली.
  • सर्व आरोपींकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.