येथे डॉक्टर, इंजिनीअर्स पेक्षा सफाई कामगारांना अधिक पगार

भारतात सफाईचे काम करणाऱ्यांना दुय्यम दर्जा दिला जातो पण ऑस्ट्रेलियात या लोकांना  प्रचंड मागणी आहे. येथे सफाई कर्मचाऱ्यांना भारतीय डॉक्टर, इंजिनीअर्स पेक्षा अधिक पगार दिला जातो तरीही येथे सफाई कर्मचाऱ्यांची प्रचंड चणचण जाणवते आहे. परिणामी सफाई क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्षाला १ कोटी पर्यंत पगार द्यावे लागत आहेत. तासाच्या हिशोबाने दिले जाणाऱ्या पैशात सुद्धा वाढ करणे भाग पडत आहे.

डेली टेलीग्राफच्या बातमीनुसार सिडने येथील क्लिनिंग कंपनी ‘अॅबसोल्युट डोमेस्टिक’ च्या व्यवस्थापकीय संचालिका जोये वेस यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सफाई कर्मचारी मिळत नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्यांना अधिक पगार देऊन कर्मचारी भरती करणे भाग पडले आहे. महिना ८ लाख पगार देऊन सुद्धा पुरेसे कामगार मिळत नाहीत. सरासरी पगार वर्षाला ७२ ते ८० लाख रुपये दिला जातो तो आता ९८ लाखांवर गेला आहे. २०२१ पासून तासाच्या हिशोबाने ४५ डॉलर्स दिले जात होते त्यातही आता वाढ करावी लागली आहे. खिडक्या, गटारे साफ करणाऱ्या कामगारांना वर्षाला ८२ लाख रुपये पगार द्यावा लागतो आहे.