येतोय एजीएमचा एच ५ प्रो रग्ड स्मार्टफोन

एजीएम मोबाईल्सने त्यांचा लेटेस्ट रग्ड स्मार्टफोन एजीएम एच ५ प्रो, प्री ऑर्डरसाठी उपलब्ध केला आहे. त्याची किंमत ३१९ डॉलर्स म्हणजे २५५७० रुपये आहे. वेबसाईटवर प्री ऑर्डर केल्यास १० टक्के सूट दिली जात आहे शिवाय काही गिफ्ट सुद्धा आहेत. अधिकृत वेबसाईट अली एक्स्प्रेस व ई बे वर हा फोन बुक करता येईल. या फोनचे अधिकृत जागतिक लाँचिंग ऑगस्ट २०२२ मध्ये होणार आहे.

या फोनची खासियत म्हणजे त्याला सर्वात मोठा स्पीकर दिला गेला असून बाहेर संगीताचा आनंद घेण्यासाठी वेगळ्या स्पीकरची गरज नाही. शिवाय फोनचा वापर सुरक्षा सायरन रुपात करता येईल. हा फोन वॉटरप्रुफ, डस्टप्रुफ, शॉकप्रुफ आहे. त्यासाठीचे आयपी ६८/ आयपी ६९ के/ एमआयएल – एसटीडी- ८१० एच सर्टिफिकेट दिले गेले आहे. कुठलेही एक्स्ट्रीम वातावरण सहन करू शकेल अश्या प्रकारे फोनचे डिझाईन केले गेले आहे.

या फोनसाठी ६.५२ इंची एचडी डिस्प्ले, अँड्राईड १२ ओएस, रिअरला ४८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा, २० एमपीचे इन्फ्रारेड नाईट व्हिजन लेन्स, २ एमपी मॅक्रो सेन्सर असा ट्रिपल कॅमेरा सेट आहे तर सेल्फी साठी २० एमपीचा कॅमेरा आहे. फोन साठी ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले गेले आहे.