पासपोर्ट किंवा आधार कार्डवर असे दिसतात आपले ग्लॅमरस कलाकार

देशात नागरिकाची ओळख म्हणून आधार कार्डचा उपयोग आहे तसेच परदेशात जाताना आपल्याला पासपोर्ट आवश्यक असतो. महत्वाच्या अश्या या दस्तावेजावरील संबंधित व्यक्तीचा फोटो ही फार गंभीर बाब असून अनेकदा हे फोटो न ओळखण्याच्या पलीकडे असतात याचा अनुभव अनेकांना येतो. व्यक्ती कितीही सुंदर असली तरी आधार किंवा पासपोर्ट वरचा फोटो कसा असेल याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. मग आपले आवडते सिने कलाकार यांचे फोटो कसे येत असतील असे कुतूहल अनेकांना वाटते. देशाचे नागरिक म्हणून सेलेब्रिटीना सुद्धा आधार कार्ड आणि पासपोर्ट काढावेच लागतात.

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिचा पासपोर्टवरील फोटो सुद्धा सुंदरच आहे. या फोटो मध्ये ती अगदी साधी आणि तरीही सुंदर दिसते आहे. बॉलीवूड शेहेन्शहा शाहरुख याचा पासपोर्टवरचा फोटो जुना आहे. शाहरुख अन्य फोटो मध्ये कितीही हँडसम दिसत असला तरी पासपोर्टच्या फोटो मध्ये सर्व सामान्य माणसासारखाच दिसतो.

कंगना रानौतच्या पासपोर्टवर तिचा जुना फोटो आहे. पण त्या फोटो मध्ये सुद्धा ती गोडच दिसते आहे.

प्रियांका चोप्रा आता आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे  पासपोर्टच्या फोटो मध्ये मात्र ती ‘देसी लुक’ मध्येच आहे.

बाहुबली फेम प्रभासचा आधारकार्ड वरचा फोटो मात्र भीषण आहे. पडद्यावर एकदम शानदार लुक असलेला प्रभास आधार कार्ड वरील फोटो मध्ये ओळखू सुद्धा येत नाही.