Air India : ‘टाटा ग्रुप’ने जानेवारीत केले होते अधिग्रहण, तीन महिन्यांत सरकारकडे आल्या एवढ्या तक्रारी


नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाविरोधात गेल्या तीन महिन्यांत सुमारे एक हजार प्रवाशांकडून सरकारकडे तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी भाड्याचा परतावा, फ्लाइटचे ओव्हर बुकिंग आणि कर्मचाऱ्यांचे वर्तन अशा विविध कारणांशी संबंधित आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री व्हीके सिंह यांनी सोमवारी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी एअर इंडियाची टेकओव्हर बोली जिंकल्यानंतर टाटा समूहाने यावर्षी 27 जानेवारी रोजी एअर इंडियाचा कार्यभार स्वीकारला होता. यापूर्वी 14 जून रोजी विमान वाहतूक नियामक DGCA ने सांगितले होते की वैध तिकीट असूनही प्रवाशांना विमानात बसू न दिल्याबद्दल आणि योग्य मोबदला न दिल्याबद्दल एअर इंडियाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.