नुपूर शर्माला मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाकडे सापडला 11 इंच लांब चाकू आणि नकाशा, राजस्थान सीमेवर अटक


जयपूर : प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा न्यायालयात धाव घेत आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यात असलेल्या हिंदू मलकोट सीमेवर बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला यापूर्वी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. त्याला कटाच्या अंतर्गत भारतात पाठवण्यात आले आहे. बीएसएफच्या चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत.

नुपूर शर्माला मारण्यासाठी पोहोचला भारतात
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, आरोपी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार होता. त्याच्यावळ अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (IB), रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) आणि लष्करी एजन्सीची संयुक्त टीम त्याची चौकशी करत आहे.

तरुणाकडे सापडला 11 इंची धारदार चाकू
सूत्रांनी सांगितले की, संशयित 16 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास श्रीगंगानगर जिल्ह्याला लागून असलेल्या हिंदुमलकोट सीमेवर संशयास्पदरित्या फिरत होता. गस्ती पथकाला संशय आल्याने त्याची चौकशी केली. त्याला नीट उत्तर देता आले नाही. झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 11 इंची धारदार चाकू, धार्मिक पुस्तके, नकाशे, कपडे आणि खाद्यपदार्थ सापडले.