महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत अधिक सक्रिय


महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत खरोखरच अधिक सक्रिय असतो आणि खासकरून लक्ष केंद्रित करणे, आवेश नियंत्रण, भाव आणि तणाव अशा बाबतीत तो अधिक सक्रिय असतो. एका ताज्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

संशोधकांनी या पाहणीत 46,034 मेंदूंच्या प्रतिमांचा अभ्यास केला. या संशोधनात 119 निरोगी लोक आणि मेंदूतील आघात, स्किझोफ्रेनिया, मनोदशा विकार, मनोविकार असे विविध आजार असलेल्या 26,683 रुग्णांचा समावेश होता. त्यात महिलांचा मेंदू काही बाबतीत पुरुषांपेक्षा खूपच सक्रिय असल्याचे आढळले.

अमेरिकेतील जर्नल ऑफ अल्झायमर डिसीज या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. “लिंग आधारित मेंदूंमधील फरक समजून घेण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरुष आणि महिलांमधील अल्झायमरसारख्या मेंदूशी निगडीत आजारांना लैंगिक आधारावर समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या फरकांना आम्ही यात निश्चित केले आहे,” असे या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि अॅमेन क्लीनिक्सचे संस्थापक डॅनियल जी. अॅमेन यांनी म्हटले आहे.

आवेश नियंत्रण, ध्यान, भावुकता, भाव आणि तणाव यांसारख्या बाबींमध्ये महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा अधिक सक्रिय असून दृश्य आणि समन्वय केंद्राच्या बाबतीत पुरुषांचा मेंदू अधिक सक्रिय असल्याचे या अभ्यासात आढळले. महिलांमध्ये खासकरून अल्झायमर आजार, नैराश्य आणि तणाव हे विकार जास्त आढळले तर पुरुषांमध्ये एडीएचडी हा आजार अधिक आढळला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment