या अभिनेत्री अशी घेतात आपल्या त्वचेची काळजी


बॉलीवूड मधील अभिनेत्री आपल्या त्वचेची काळजी कशी घेतात हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्या आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी ज्या गोष्टींचा वापर करतात त्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहजी मिळून जातात.

सोनाक्षी सिन्हा : सोनाक्षीला आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी नैसर्गिक वस्तूंवर जास्त भरोसा आहे. ती आपल्या त्वचेकारिता केशराचा वापर करते. त्यामुळे तिच्या चेहऱ्याचा पिग्मेंटेशन पासून बचाव होतो असे ती सांगते. तसेच उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला सावळेपणा ही केशराच्या वापरामुळे दूर होतो असे तिचे म्हणणे आहे.

श्रीदेवी : पन्नाशीच्या घरात पोहोचूनही श्रीदेवीच्या चेहऱ्याचे सौंदर्य जरा ही कमी झालेले नाही. ती तिच्या त्वचेकरिता फ्रुट पॅक्स वापरत असल्याचे सांगते. त्याचबरोबर आपल्या आहाराबद्दलही श्रीदेवी अतिशय जागरूक असते. संत्र्याचा गर वा साले वापरून बनविलेला फेस पॅक आपल्या चेहऱ्यासाठी वापरणे श्रीदेवी पसंत करते.

प्रियांका चोप्रा : आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रियांका दह्याचा वापर करते. दह्यामुळे त्वचेवरील उन्हाचा राप कमी होऊन त्वचा मऊ, नितळ होते. प्रियांकाच्या आहारातही दह्याचा समावेश नियमित असतोच.

काजल अगरवाल : काजल आपल्या चेहऱ्याकरिता नारळापासून तयार केलेल्या वस्तू वापरते. नारळाचे पाणी, नारळाचे तेल आणि तिच्या आहारातही नारळाच्या खोबऱ्याचा नियमित समावेश असतो.

ऐश्वर्या राय बच्चन : ऐश्वर्या आपल्या चेहऱ्याकरिता काकडी वापरून तयार केलेला फेस मास्क नियमित वापरते. काकडी मध्ये त्वचेला आर्द्रता देणारी तत्वे असतात. काकडीच्या वापरामुळे त्वचेवरील लाली किंवा होत असलेली जळजळ कमी होण्यास मदत मिळते. काकडीच्या रसात बुडवून कापूस डोळ्यांभोवती ठेवल्यास डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळते. तसेच डोळ्यांच्या खाली आलेली सूजही कमी होण्यास मदत मिळते.

श्रद्धा कपूर : श्रद्धा आपल्या केसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी हिरव्या सफरचंदांची पेस्ट केसांना लावणे पसंत करते. हिरव्या सफरचंदाच्या पेस्ट मुळे केसांना चमकदारपणा मिळतो आणि केस जास्त दाट दिसतात असे श्रद्धा सांगते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment