मध्यंतरीच्या काळात दाढी ठेवण्याचा ट्रेंड मागं पडला होता. परंतु आता दाढी ठेवण्याकडील तरूणाईचा कल वाढला आहे. असं असलं तरी नियमित दाढी करणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
दाढी करा.. पण जपून
मित्रानों, सध्याच्या फॅशनच्या युगात आपला हटके लूक असावा असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी विविध आकर्षक केशरचनांचा आधार घेतला जातो. त्याच बरोबर हल्ली दाढीही विविध आकर्षक प्रकारात ठेवण्यावर भर दिला जात आहे.
आपल्याला दाढी शोभत नाही असाही अनेकांचा समज असतो. असे तरूण जरा दाढी वाढली की शेव्हिंग करतात. परंतु दाढी रेखीव तसंच जखम न होता करणं हे तसं कौशल्याचं किंबहुना जिकीरचं काम असतं. परंतु काही सोप्या टीप्सचा अवलंब करून तुम्हाला सहजपणे आणि व्यवस्थित दाढी करता येते.
सध्याच्या फॅशनच्या युगात दाढीही विविध आकर्षक प्रकारात ठेवण्याकडील कल वाढला आहे. असं असलं तरी नियमितपणे दाढी करणाऱ्यांची संख्याही लक्षात घेण्यासारखी आहे. परंतु दाढी रेखीव आणि जखमा न होता करणं हे कौशल्याचं काम असतं. त्यासाठी काही टीप्स महत्त्वाच्या ठरतात.
काय आहेत या टीप्स…
* दाढी करताना केस बेसिनमध्ये पडतात. यामुळे बेसिनमध्ये पाणी साचण्याची शक्यता असते. म्हणून दाढी करताना केस बेसिनमध्ये अडकणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी बेसिन वेळच्या वेळी स्वच्छ करायला हवं.
* दाढीचे केस कमी करण्यासाठी आधी ट्रिमरचा वापर करावा आणि त्यानंतर बारीक केसांवर रेझरचा वापर करावा. याचं कारण ट्रिमरच्या वापरानं केस कमी झाल्यामुळे ते रेझरच्या सहाय्यानं काढून टाकणं सहजा सहजी शक्य होतं. साहजिक अधिक केस असताना होणाऱ्या त्रासापासून सुटका होऊ शकते.
* अनेकांना दाढी केल्यानंतर परत आंघोळ करण्याची सवय असते. परंतु यामुळे कामावर जाण्यासाठी वा महत्त्वाच्या कामासाठी उशीर होऊ शकतो. हे लक्षात घेता दाढी केल्यानंतर आंघोळ करण्याऐवजी फक्त तोंड धुण्याचा मार्गही श्रेयस्कर ठरणार आहे.
* दाढी करताना बेसिनमध्ये पडलेले केस स्वच्छ करण्यासाठी पुठ्ठयाचा वापर करता येईल. पुठ्ठा वापरल्याने ही स्वच्छता करताना हात खराब होणार नाहीत आणि बेसिनही स्वच्छ होण्यास मदत होईल.
* दाढी करताना केस ब्लेडमध्ये अडकून बसतात. त्यामुळे वेळच्या वेळी रेझर नीट स्वच्छ करणं गरजेचं ठरतं. या कामाचा कंटाळा करणं उचित ठरत नाही.
* दाढीनंतर आफ्टर शेव्ह लोशनचा अवश्य वापर करावं. हे आफ्टर शेव्ह लोशन उत्तम दर्जाचं असावं. ते तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेसाठी हानीकारक ठरत नाही ना, हेही पाहिलं जाणं आवश्यक आहे.