त्वचेवरील पिग्मेंटेशन आणि त्यावरील उपायांबाबतचे गैरसमज


त्वचेवरील असमान वर्ण, काळसर किंवा भुरकट दिसणारे डाग ही सर्व पिग्मेंटेशन ची लक्षणे आहेत. पिग्मेंटेशन कोणाला ही होऊ शकते. पण जास्त करून महिलां मध्ये हा त्रास पहावयास मिळतो. त्वचेवर पिग्मेंटेशन होण्याची अनेक कारणे आहेत, उदाहरणार्थ सतत उन्हामध्ये फिरणे, किंवा हॉर्मोनल इम्बॅलंस, इत्यादी. त्यावर अनेकदा अनेक जणे निरनिराळे उपायही सुचवत असतात. पण हे उपाय खरोखर किती लागू पडतात हे मात्र कोणीही सांगू शकत नाही.

त्वचा लुफा किंवा प्युमीस स्टोन ने घासली तर पिग्मेंटेशन मुळे आलेले डाग कमी होतात हा एक गैरसमज आहे. त्या उलट जर लुफाने किंवा प्युमीस स्टोनने त्वचा जोरजोरात घासली तर बाहेरील हानिकारक घटकांपासून त्वचेचा बचाव करणारे आवरण निघून जाऊन त्वचा जास्त नाजूक होईल. त्यामुळे पिग्मेंटेशन असल्यास चेहरा घासणे टाळून उत्तम प्रतीच्या सनस्क्रीन चा वापर करावयास हवा. त्वचारोगतज्ञाचा सल्ला ही या बाबतीत उपयोगी पडू शकेल.

दररोज सकाळी सनस्क्रीन लावल्याने पिग्मेंटेशन कमी होते हा अजून एक गैरसमज आहे. जर उन्हामध्ये सतत वावर असेल तर दर दोन तासांनी सनस्क्रीन लावावयास हवे. आभाळ आलेले असेल किंवा ऊन नसेल तरी सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. गाडीमधून प्रवास करत असताना देखील सनस्क्रीनचा वापर अवश्य करावा. आणि केवळ सनस्क्रीनच नव्हे, तर उन्हापासून आपल्या चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी गॉगल्स, टोपी, स्कार्फ इत्यादींचा ही वापर करावा.

पिग्मेंटेशन केवळ उन्हात वावरल्यामुळे होते हा समज चुकीचा आहे. उन्हात वावरणे हे पिग्मेंटेशन होण्यामागचे मुख्य कारण आहे हे जरी खरे असले तरी त्या व्यतिरिक्तही अनेक कारणे पिग्मेंटेशन होण्यामागे असू शकतात. हॉर्मोनल इम्बॅलंस, किंवा हायपोथायरॉइडीझम, ही देखील पिग्मेंटेशन च्या मागची कारणे असू शकतात. डायबेटीस मुळे गळ्याच्या भोवती काळसरपणा दिसू लागण्याची शक्यता असते. परफ्युम्स किंवा डीओडरंट च्या अति वापरामुळे ही पिग्मेंटेशन चा त्रास उद्भवू शकतो. धुम्रपान, अति मानसिक तणाव या मुळे ही पिग्मेंटेशन होऊ शकते. तसेच जास्त क्लोरीनेटेड पाण्यात पोहाल्याने, किंवा सौंदर्य प्रसाधनाची अॅलर्जी झाल्यामुळे पिग्मेंटेशन होऊ शकते.

पिग्मेंटेशनचा त्रास उद्भविल्यास तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे उपाययोजना करावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment