जगातील सर्वात खतरनाक जंगल, येथे गेलेली प्रत्येक व्यक्ती होते गायब

जगभरात अनेक आश्चर्यकारक ठिकाण आहेत. काही ठिकाण खूपच शांत आहेत, तर काही खूपच भितीदायक. काहीशी असेच भितीदायक ठिकाण रोमानियाच्या ट्रांसल्वेनिया प्रांतात आहे. या ठिकाणी एवढ्या विचित्र घटना घडतात की, या ठिकाणी जायच्या विचारानेच थरकाप उडतो.

‘होया बस्यू’ जगातील सर्वात खतरनाक जंगलापैंकी एक आहे. या ठिकाणी घडणाऱ्या विचित्र घटनांमुळेच याला ट्रांसल्वेनियाचा बर्मुडा ट्रँगल म्हटले जाते. हे जंगल 700 एकरमध्ये पसरलेले असून, सांगण्यात येते की, येथे शेकडो लोक गायब झाली आहेत.

(Source)

या जंगलातील झाडे वाकलेली आणि वाकडी-तिकडी आहेत. दिवसा प्रकाशात देखील ही झाडे भितीदायक वाटतात. या जागेला लोक यूएफओ आणि भूत-प्रेतांशी देखील जोडतात.

एक मेंढपाळ अचानक गायब झाल्यानंतर हे जंगल चर्चेचा विषय ठरले होते. हा व्यक्ती रहस्मयीरित्या गायब झाला होता. विशेष म्हणजे त्याच्याबरोबर त्यावेळी 200 मेंढ्या देखील होत्या.

(Source)

काही वर्षांपुर्वी एक सैन्य टेक्निशियनने येथे यूएफओ बघितल्याचे दावा केला होता. याशिवाय 1968 मध्ये देखील एमिल बरनिया नावाच्या व्यक्तीने येथे आकाशात एक अद्भूत शरीर बघितल्याचा दावा केला होता. येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.येथे विचित्र आवाज देखील ऐकायला येतात. त्यामुळे याठिकाणी येण्याची कोणाचीच हिंमत होत नाही.

(Source)

एका कथेनुसार, 1870 मध्ये येथील गावातील एका शेतकऱ्याची मुलगी जंगलात गायब झाली होती. मात्र आश्चर्यकारकरित्या ती 5 वर्षांनी परत आली. मात्र ती सर्व विसरली होती. काही दिवसांनी लगेच तिचा मृत्यू झाला.

 

Leave a Comment