जाणून घ्या जगातील 5 चित्रविचित्र धबधब्यांविषयी

धबधबे तर तुम्ही अनेक पाहिले असतील. मात्र जगभरात असे अनेक विचित्र धबधबे आहेत, ज्याबद्दल वाचून तुम्ही देखील हैराण व्हाल. आज आम्ही तुम्हाला असेच काही विचित्र धबधब्यांबद्दल सांगणार आहोत.

(Source)

तुर्कीतील ‘पामुकक्ले धबधब्या’ने आपल्या सुंदरतेमुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवले आहे. हा धबधबा जवळपास 8807 फूट लांब आणि 1970 फूट रूंद आहे. या धबधब्याची उंची जवळपास 525 फूट आहे.  हा एक हटके धबधबा आहे, कारण याच्यावर दगडांच्या आकाराचे एक छप्पर बनते. यामुळे हा धबधबा ‘बाथिंग स्पॉट’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

(Source)

कॅलिफोर्नियातील ‘हॉर्सटेल धबधबा’ जवळपास 1560 फूट उंच आहे. या धबधब्याची खास गोष्ट म्हणजे, हिवाळ्यात याचा प्रवाह वाढतो आणि असे म्हटले जाते की, फेब्रुवारीच्या शेवटच्या दोन आठवड्यात याचा रंग देखील बदलतो. रात्र होताच या धबधब्याचा रंग लाल होतो. पाहताना असे वाटते की, जणू पाण्यात आगच लागली आहे.

(Source)

हा टेनेसीचा ‘रूबी धबधबा’ आहे. हा अमेरिकेतील सर्वात खोल धबधबा आहे. 145 फूट खोल धबधब्याचे नाव याचा शोध लावणाऱ्या रूबी लेमबर्टच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. या धबधब्याच्या पाण्यात अधिक मात्रेत मॅग्नेशियम आढळते. दरवर्षी हा धबधबा बघायला 4 लाखांपेक्षा अधिक पर्यटक येतात.

(Source)

मॉरिशिसमध्ये एक असा धबधबा आहे, जो पाहताना असे वाटते की पाण्याच्या आतच आहे. त्यामुळे याला ‘अंडरवॉटर धबधबा’ असे म्हणतात. वाळू आणि गाळामुळे हा धबधबा पाण्याच्या आत असल्याचा अनुभव येतो.

(Source)

कॅनेडाच्या अल्बर्टा येथे ‘कॅमेरॉन फॉल’ हा धबधबा आहे. हा धबधबा जून महिन्यात रंग बदलून गुलाबी होतो. पावसामुळे धबधब्याच्या पाण्यात एग्रीलाइट नावाचा पदार्थ मिसळला जातो. त्यामुळे उन्हात याचे पाणी गुलाबी रंगाप्रमाणे चमकू लागते.

Leave a Comment