केळे : आरोग्य जपण्यास फायदेकारक


केळ्याला “ सुपर फूड “ असे म्हटले गले आहे, कारण केळ्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. केळ्यामध्ये फायबर बरोबरच नैसर्गिक शुगर्स ( सुक्रोज आणि फ्रुक्टोज ), प्रथिने आणि क्षार मुबलक प्रमाणात असतात. “ अॅन अॅपल अ डे “ पेक्षा सुद्धा केळ्यामध्ये पोषण द्रव्ये अधिक मात्रेमध्ये आहेत. म्हणूनच केळ्याला “ आरोग्याची खाण “ म्हटले गेले आहे. भारतामध्ये केळे अगदी सहज उपलब्ध होणारे आणि सहज परवडण्याजोगे फळ आहे. कच्चे केळे खाण्यापेक्षा पिकलेले केळे आरोग्यास अधिक फायदेकारक आहे. पिकलेल्या केळ्यामध्ये असलेले TNF हे तत्व कर्क रोग प्रतिकारक आहे. त्याचबरोबर केळ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. केळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारून पांढऱ्या रक्तपेशींच्या संख्येमध्ये वाढ होते. “ इंस्टंट एनर्जी “ देणारे हे फळ आहे.

ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तिंसाठी केळे उत्तम, कारण त्यामध्ये सोडियम चे प्रमाण अतिशय कमी असते. त्याशिवाय केळ्यामध्ये असणाऱ्या पोटॅशियम मुळे स्नायूंमध्ये येणारे क्रॅम्प्स कमी होण्यास मदत मिळते. खूप शारीरिक श्रमानंतर , विशेषतः व्यायाम केल्यानंतर केळ्याचे सेवन अवश्य करावे. केळ्यामध्ये असलेल्या लोहाच्या मात्रेमुळे शरीरामधील हेमोग्लोबिन ठीक राहून अनिमिया बरा होण्यास मदत मिळते. पोटामध्ये अल्सर्स असल्यास डॉक्टर सर्वसाधारणपणे आहाराची पुष्कळ पथ्ये पाळावयास सांगतात. पण केळे मात्र या पथ्यास अपवाद आहे. पिकलेले केळे पचनास हलके असल्याने त्याच्या सेवनाने पोटदुखी, किंवा पोटात जळजळ असले त्रास उद्भवत नाहीत.

केळ्यामध्ये असलेले ट्रीप्टोफॅन हे तत्व अँटी डीप्रेसंट आहे., म्हणजेच केळ्याच्या सेवनाने शरीरातील सेरोटोनीन वाढून मनःस्थिती सुधारण्यास मदत मिळू शकते. केळे पचावयास हलके आणि फायबर युक्त असल्याने ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रासा आहे, त्यांनी केळ्याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो. केळ्यामध्ये असलेली ‘ b ‘ गटाची प्रथिने शरीराचे एकंदर आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.

असे हे बहुगुणकारी केळे – याचा आपल्या आहारात जरूर समावेश करावा आणि निरोगी शरीर राखण्याकडे वाटचाल करावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment