अनोखा जुगाड : या बैलगाडीचे होत आहे कौतुक, आयएएस अधिकारी म्हणाले – काय आयडिया आहे! पहा फोटो


सोशल मीडियावर दररोज असे काही फोटो समोर येतात, जे पाहून तुमची इच्छा नसतानाही त्यावर तुमच्या प्रतिक्रिया येत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो बैलगाडीचे आहे. बैलांवरचे ओझे कमी करण्यासाठी बैलगाडीच्या मालकाने त्यात दुसरे चाक लावल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे छायाचित्र ट्विट केले आहे. हा फोटो पाहून लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

हा फोटो शेअर करत IAS अधिकारी अवनीश शरण यांनी कॅप्शन लिहिले आहे की, बैलांचा भार कमी करण्यासाठी बैलगाडीला रोलिंग स्पोर्ट लागू करण्यात आला होता. त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत 14 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1500 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्स यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. कोणी त्याला माणुसकी आणि मानवतेशी जोडत आहेत, तर कोणी तंत्रज्ञानाचा खरा वापर सांगत आहेत.

त्याच वेळी, मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की आरआयटी राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूरच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ प्रकल्पांतर्गत उसाच्या बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट लावला आहे. या विद्यार्थ्यांनी बैलगाडीतील दोन बैलांच्या मध्ये तिसरे चाक लावले आहे.

या विद्यार्थ्यांच्या या शोधामुळे बैलांवरचा भार कमी होतो आणि बैलगाडीही उत्तम प्रकारे संतुलित राहते. याशिवाय, या रोलिंग सपोर्टची उंची देखील समायोजित केली जाऊ शकते. या जुगाडच्या आविष्काराचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.