चंदीगड : माजी क्रिकेटर आणि काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू आणि पंजाबी गायक दलेर मेहंदी यांची पंजाबच्या पटियाला तुरुंगात जोडी बनली आहे. तुरुंग प्रशासनाने दोघांनाही एकाच बॅरेकमध्ये ठेवले आहे. सिद्धू आणि दलेर मेहंदी हे जुने मित्र आहेत. ते अनेक टीव्ही शोमध्ये एकत्र दिसले आहेत. शिक्षा मिळाल्यानंतर दलेर मेहंदी खूप निराश झाला आहे. तुरुंगात सिद्धूने त्याला बोलून प्रोत्साहन दिले.
पटियाला जेलमध्ये सिद्धू-दलेर मेहंदीची जमली जोडी: दोघांनाही ठेवण्यात आले एकाच बॅरेकमध्ये; माजी क्रिकेटर आणि पंजाबी गायक यांची जुनी मैत्री
सिद्धू रोडरेज प्रकरणात भोगत आहे शिक्षा
34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी नवज्योत सिद्धू एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. सिद्धूला या प्रकरणात दंड भरल्यानंतरच सोडून देण्यात आले होते. त्याविरोधात कुटुंबाने पुनर्विचार याचिका दाखल केली. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय बदलून सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तेव्हापासून तो पटियाला कारागृहात बंद आहे.
मानवी तस्करीप्रकरणी दलेर दोषी
दलेर मेहंदीला कबूतरबाजी म्हणजेच मानवी तस्करी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. हे प्रकरण 2003 सालचे आहे. 10 लोकांना आपल्या टीमचे सदस्य बनवून बेकायदेशीरपणे अमेरिकेत नेल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण नंतर दलेरचेही नाव पुढे आले. त्याला 2018 मध्ये ट्रायल कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात ते पटियालाच्या सत्र न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली, त्यानंतर त्यांची रवानगी पटियाला तुरुंगात करण्यात आली.