इतके श्रीमंत आहेत ललित मोदी
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि माजी विश्वसुंदरी सुश्मिता सेन यांच्या डेटिंग विषयीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ललित मोदी फरार घोषित आहेत. मात्र त्याचा त्यांच्या लाईफस्टाईल वर किंवा कमाईवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. आज घडीला ललित मोदी यांची संपत्ती ४५०० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर जेथून ब्रिटीश सरकारचा कारभार चालतो त्याच रस्त्यावर असलेल्या एका अलिशान हवेली मध्ये त्यांचे वास्तव्य आहे.
१४ जुलै रोजी ललित मोदी यांनी एक ट्वीट करून त्यात ते सुश्मिता सेनला डेट करत असल्याची माहिती दिली त्यामुळे ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले. ललित सध्या काय करतात, त्यांची कमाई या विषयी मोठ्या प्रमाणावर सर्च सुरु झाला. त्यावर त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले. ट्वीटर वरील एका प्रश्नाला उत्तर देताना ललित यांनी ते मोदी एन्टरप्रायजेसचे प्रेसिडेंट असल्याचे सांगितले. त्यांची एकूण संपत्ती १२ हजार कोटींची असून कृषी, तंबाखू, पान मसाला, माउथ फ्रेशनर, कन्फेक्शनरी, रिटेल, शिक्षण, कॉस्मेटिक्स, मनोरंजन, रेस्टॉरंट क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत. भारताबरोबरच मिडिल इस्ट, वेस्ट आफ्रिका, साउथ इस्ट आफ्रिका, पूर्व युरोप, ऑस्ट्रेलिया, द. अमेरिका, मध्य अमेरिका येथे या व्यवसायाचा व्याप आहे.
ललित मोदी यांची वैयक्तिक संपत्ती ४५०० कोटी असून १५ कोटी किमतीच्या तीन फेरारी त्यांच्या वाहन ताफ्यात आहेत. लंडनच्या प्रतिष्ठित ११७, स्लोएन स्ट्रीटवर पाच मजली अलिशान हवेलीत त्यांचा मुक्काम आहे. ही हवेली त्यांनी लीज वर घेतली असून त्यासाठी महिना २० लाख रुपये भाडे दिले जाते. आयपीएल ही त्यांच्याच सुपीक मेंदूतून निघालेली कल्पना आहे असे म्हटले जाते.