Sri Lanka Crisis : गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा मंजूर, पंतप्रधान विक्रमसिंघे घेणार काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून शपथ


कोलंबो – मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर कोलंबोच्या रस्त्यांवर जल्लोषाचे वातावरण आहे. आंदोलक गोटाबायांच्या राजीनाम्याकडे आपला विजय म्हणून पाहत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा अनेकांनी कोलंबोच्या रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला. यावेळी फटाके फोडण्यात आले, लोक मस्ती करताना दिसले. दुसरीकडे, आंदोलकांनी ताब्यात घेतलेल्या महत्त्वाच्या सरकारी इमारतींमधूनही आता माघार घेण्यास सुरुवात केली आहे.

कार्यवाहक राष्ट्रपती असतील रानिल विक्रमसिंघे
श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात आहे. नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे ते म्हणाले. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी आज खासदारांना बोलावण्यात आले आहे.