ब्रिटन पंतप्रधान शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन पंतप्रधान निवडीसाठी मतदानाच्या फेऱ्या सुरु असताना भारतवंशी ऋषी सुनक यांनी दुसऱ्या फेरीअखेर मजबूत आघाडी घेतली आहे. १०१ मतांसह ते आघाडीवर असून त्यांचा पाठोपाठ पेनी मोन्दोर या ८३ मते घेऊन दोन नंबर वर आहेत.

या दरम्यान ऋषी सुनक यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी,’ निवडणूक जिंकण्यासाठी कर कमी करण्याच्या घोषणा करणार नाही तर निवडून आल्यानंतर कर कमी कसे करता येतील यासाठी प्रयत्न करेन असे सांगितले आहे. त्याचबरोबर मी कधीच कुणाचा बँक बॅलंस पाहून त्या व्यक्तीविषयी मत बनवत नाही. तेसेच तुम्हीही बँक बॅलंसपेक्षा त्या व्यक्तीचे काम कसे आहे यावरून त्याला मतदान करावे’ असे म्हटले आहे.

मतदानाच्या दुसऱ्या फेरीत परराष्ट्र मंत्री लीस टूस, वाणिज्य मंत्री पेनी मोर्डोट, माजी कॅबिनेट मंत्री केमी बेदेनोच सह अन्य पाच जण होते. पहिल्या टप्प्याच्या मतदानात सुद्धा सुनक यांनी ८८ मते मिळवून आघाडी घेतली होती तर पेनी यांना ६७ मते मिळाली होती. या स्पर्धेत राहण्यासाठी किमान ३० मते मिळावी लागतात. गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात ३५८ सदस्यांनी मतदान केले होते.

५ सप्टेंबरला नवीन पंतप्रधान निवडले जातील. १५० वर्षाहून अधिक काळ भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांच्या मायदेशात आता भारतवंशी सुनक राज्य करतील काय याची भारतीय जनतेला मोठी उत्सुकता आहे.