स्वतःची इंटरनेट सेवा देणारे केरळ देशातले पहिले आणि एकमेव राज्य
स्वतःची इंटरनेट सेवा पुरविणारे पहिले आणि एकमेव राज्य बनण्याचा पराक्रम केरळने केला असून मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ट्वीट करून केरळ फायबर ऑप्टीक नेटवर्क लिमिटेड, दूरसंचार विभाग इंटरनेट सेवा पुरवठा परवाना मिळाल्याचे जाहीर केले आहे.
गरीब घराघरातली प्रत्येक व्यक्ती पर्यंत इंटरनेट सेवा पोहोचविण्याची महत्वाकांक्षी योजना केरळ सरकारने तयार केली होती आणि १५४८ कोटी खर्चाच्या या फायबर ऑप्टीक नेटवर्कला मंजुरी दिली होती. यामुळे २० लाख गरीब परिवारांना फ्री हायस्पीड इंटरनेट कनेक्शन दिले जाणार आहे. शिवाय ३० हजार हून अधिक सरकारी ऑफिसेस आणि शाळा नेटने जोडल्या जाणार आहेत. यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास वेगाने होण्यास मदत मिळेल असे विजयन यांचे म्हणणे आहे.
पूवीपासूनच साक्षरतेबाबत सुद्धा केरळ देशात नेहमीच आघाडीवर राहिलेले राज्य आहे.